गोंदिया नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक मोठ्या जनसमर्थनाने निवडून आले.या विजयाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या अभिनंदन सोहळ्यास खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी गोंदिया जिल्ह्यातील नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी खासदार पडोळे यांनी गोंदिया शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.नागरिकांनी दिलेला विश्वास आणि जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी नवनिर्वाचित प्रतिनिधीवर असल्याचे मनोगत व्यक्त केले.