रत्नागिरी: रत्नागिरीत नवरात्रोत्सवासाठी फुलांची दुकाने सज्ज; पण वाढत्या दरांमुळे ग्राहक चिंतेत
सध्या सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहरात सर्वत्र उत्सवाचे वातावरण आहे. उत्सवासाठी आवश्यक असलेल्या फुलांची दुकाने शहरांच्या विविध भागांमध्ये विशेषतः मोक्याच्या ठिकाणी थाटली गेली आहेत. या दुकानांमध्ये विविध प्रकारची आकर्षक फुले पाहायला मिळत आहेत.