आज दुपारी १ च्या सुमारास सुतारवाडी येथील गीताबाग कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रिक्षा चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी आणि चालकांच्या प्रश्नांबाबत आढावा बैठक पार पडली. यावेळी रिक्षा चालकांच्या परिवहन विभागाशी संबंधित समस्या, रिक्षा स्टँड, वाहतूक कोंडी तसेच चालक-मालक संघटनेच्या इतर समस्या गांभीर्याने जाणून घेतल्या. बैठकीत रिक्षा चालकांचे प्रश्न व समस्या तातडीने सोडवण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच उर्वरित प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचा शब्द दिला. याप्रसंगी माजी आमदार अनिकेत तटकरे, विविध रिक्षा चालक-मालक संघटनांचे पदाधिकारी, तसेच रिक्षाचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.