जालना शहरातून वाहणार्या सीना नदीकाठी मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक व थर्माकोलयुक्त कचरा टाकण्यात येत असून हा प्रकार मनपा अधिकारी व कर्मचार्यांच्या निदर्शनास आला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जालना महानगरपालिका यांच्याकडून सुमारे 13 हजार झाडांची लागवड करण्यात आली असून ती झाडे चांगल्या प्रकारे वाढलेली आहेत. रविवार दि. 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार याच परिसरात दररोज प्लास्टिक कचरा जाळण्यात येत असल्याने पर्यावरणासह या झाडांच्या अस्तित्वावर गंभीर धोका निर्माण झाला.