चोपडा शहरात बस स्थानक आहे. या बसस्थानकावर प्रवासासाठी मोहम्मद सिद्दिक नूर मोहम्मद मोमीन वय ६९ हे वृद्ध व्यापारी आले होते गर्दीचा फायदा घेत त्यांच्या खिशातून ५० हजाराची रोकड अज्ञात चोरट्याने चोरी केली. तेव्हा याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.