साकोली तालुक्यातील खंडाळा येथे ट्रॅक्टरचा मालक खेतराज याच्या सांगण्यावरून ट्रॅक्टर चालक दीपक मोजे याने खंडाळा येथे कुठलीही परवानगी न घेता रेतीची चोरी करून वाहतूक करताना गुरुवार दि.18 डिसेंबरला सकाळी 10वाजता नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा भंडाऱ्याच्या चमुला आढळून आल्याने ट्रॅक्टर चालक व मालक या दोघांवरील साकोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे