महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणार्या ‘मिशन वात्सल्य व मिशन शक्ती’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एकल महिला पुनर्वसन, मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती तसेच मिशन वात्सल्य त्रैमासिक आढावा बैठक यांचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दि. 29 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हाधिकारी यांनी विविध योजनांची आंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.