संगमनेरात अवैध वाळू वाहतुकीवर सकाळी धडक कारवाई कुरकुंडी शिवारात वाळूचा डम्पर पकडला; १० लाखांचा मुद्देमाल जप्त संगमनेर तालुक्यातील कुरकुंडी गावाच्या शिवारात सकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध वाळू वाहतुकीवर धडक कारवाई करत एक डम्पर ताब्यात घेतला. या कारवाईत वाळूची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या पिलाजी महादू नंदकर (वय ४१, रा. शेळकेवाडी, ता. संगमनेर) याला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून वाळूने भरलेला डम्परसह एकूण सुमारे १० लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.