हिंगणघाट : गांजा अंमली पदार्थाची विक्री करणारा गुन्हेगार व त्याचा अल्पवयीन साथीदारवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करीत १लाख ७५ हजार रुपये २८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट परीसरातील संतोषी माता मंदिर जवळ एन.डी.पि.एस. कायद्याचे तरतुदींचे तंतोतंत पालन करून रेड केला असता, आरोपी व अल्पवयीन साथीदार असे दोघेही तेथे संशयास्पद रित्या हजर मिळुन आले. त्यांची कायदेशीररित्या झडती घेतली असता, झडती दरम्यान त्यांचेजवळ गांजा अंमली पदार्थ मिळुन आला.