श्री संत जगनाडे नागरी पतसंस्था सेवा मर्यादित कूही येथे उपाध्यक्ष पदी जितेंद्र लेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. सदर पतसंस्था मध्ये उपाध्यक्ष पद रिक्त होते. रिक्त पद भरण्यासाठी निवडणूक अधिकारी सीमा टेकाम यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. याप्रसंगी उपाध्यक्ष पदी जितेंद्र लेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जितेंद्र लेंडे यांचे अभिनंदन करण्यात आले.