नाशिक: उत्तमनगर व पवननगर येथे कानबाई उत्सव मिरवणूक, महिलांचा मोठा सहभाग
Nashik, Nashik | Aug 4, 2025 धुळे,जळगाव,नंदुरबारसह खानदेशाच्या विविध भागातून नाशिक मध्ये रोजगारासाठी स्थायिक झालेल्या नागरिकांनी खानदेशाची परंपरा जोपासत आज दि. 4 ऑगस्ट सोमवारी सकाळी नऊ वाजेपासून ज सायंकाळी चार वाजेपर्यंत कानबाई उत्सव साजरा करत भव्य अशा मिरवणुका काढल्या. नवीन नाशिक मधील उत्तम नगर पवन नगर या भागात या निमित्ताने महिला वर्गांचा या उत्सवात मोठा सहभाग दिसून आला.