पारोळा : सौर कृषी पंपासाठी विहिर सर्वेक्षण करण्यासाठी तडजोडीअंती एक हजारांची लाच स्वीकारताना पारोळा येथील वीज कंपनीचा वरिष्ठ तंत्रज्ञ भाऊसाहेब गोरख पाटील (33) यास नंदुरबार एसीबीने अटक केली. त्यानंतर त्यास आज अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्याच्या जामीन नामंजूर करण्यात आला असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे