समुद्रपुर:तालुक्यातील उबदा येथे बनावट दारू,सुगंधीत तंबाखु व गुटखा ची र्निमीती करून त्याची अवैध विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत ४ लाख ५३ हजार १०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्राप्त माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा यांचे शासनाने प्रतीबंधीत केलेला सुगंधीत तंबाखु,गुटखा व दारूची अवैध विक्री करणा-या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.