श्रीगोंदा मारहाण प्रकरण: पोलीस स्टेशन डायरीतील नोंदीने प्रकरणाला वेगळे वळण.. “आमचा आपापसात समझोता झाला आहे..! त्यामुळे आम्ही तक्रार न देता निघून जात आहोत.”..? ‘त्या’ रात्री नेमकं काय घडलं.? श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण राज्यभरात उमटत आहेत. मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या स्टेशन डायरीतील अधिकृत नोंदींनुसार, समोर येत असलेले वास्तव काहीसे वेगळे असल्याचे दिसून येत आहे.