औसा: किल्लारी येथे आ.अभिमन्यू पवार यांच्या हस्ते १ कोटी ४२ लाख रुपयांच्या बंधारे कामांचे भूमिपूजन
Ausa, Latur | Mar 10, 2024 आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाने औसा तालुक्यातील किल्लारी येथे १ कोटी ४२ लाख रुपयांच्या कोल्हापुरी बंधारा कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कोल्हापूरी बंधात्यामुळे परीसरातील शेतक-यांच्या शेतीला साठवलेल्या पाण्याचा भरपूर फायदा होईल शिवाय पावसाळ्यात पडणारे पाणी नदीपात्रातून वाहुन नजाता अडवून परीसरतील जमीनीच्या पाणीपातळीत वाढ होण्यासाठी बंधाऱ्याची मोठी मदत होणार आहे. साधारण या बंधा-यात ३ मिटरपर्यंत पाणीसाठा होणार असून ५० हेक्टर जमीन, यामुळे ओलिताखाली येणार आहे.