चोरट्यांनी भर दिवसा घरफोडी करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून दोन लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना पालम तालुक्यातील वनभुजवाडी येथे 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. याप्रकरणी 16 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता पालम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.