पाचोरा: नगरदेवळा यात्रेत महिलेच्या छेडछाड प्रकरणी चौघा तरुणांवर पाचोरा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल,
नगरदेवळा येथे पार पडलेल्या यात्रेदरम्यान एका विवाहित महिलेला छेडछाड करून त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात चौघा तरुणांविरुद्ध विनयभंग, मारहाण व गोंधळ घालण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 9 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता हाती आली आहे, पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील 25 वर्षीय विवाहित महिला आपल्या पती, सासू आणि दोन मुलांसह बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रीच्या 10 - 11 वाजेच्या सुमारास नगरदेवळा गावातीलच यात्रेला गेली होती.