महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून तालुक्यातील औराळा येथे कामगारांसाठी विनामूल्य गृहपयोगी संच वितरण केंद्राचे उद्घाटन आमदार संजना जाधव यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.कष्टकरी बांधकाम कामगारांच्या दैनंदिन जीवनात दिलासा मिळावा व त्यांच्या कुटुंबांच्या गरजा सुलभ व्हाव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.संच वितरणामुळे कामगारांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद दिसून आला.