साकोली तालुक्यातील परसोडी येथील नरेश वघारे हे खाजगी कामासाठी सिंदेवाही येथे संपूर्ण परिवारासह 14 डिसेंबरला गेले होते.16 डिसेंबरला रात्री7वाजता ते परत आले असता त्यांना घराच्या मागील बाजूचा दरवाजाचे कोंडा तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण 36हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले साकोली पोलीस ठाण्यात त्यांनी चोरीची तक्रार दाखल केली अज्ञात चोरट्याविरुद्ध बुधवार दिनांक 17 डिसेंबरला सकाळी 11 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे