शाहूवाडी: 85 वर्षीय वृद्धाचा मृतदेह पाटणे गावातील कडवी नदीच्या पात्रात आढळला.परिसरात मृत्यूमुळे खळबळ
शाहुवाडी तालुक्यातील पाटणे गावातील आनंदा गणपती रोडे या 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृतदेह कडवी नदीच्या पात्रात आज गुरुवार दिनांक 10 जुलै दुपारी तीन वाजता आढळून आला. पोलीस व केडीआरएफच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढला. सहा वाजता शाहूवाडी पोलिसांनी माहिती दिली.