भंडारा: कोका अभयारण्यालगत मंडणगाव-खमारी परिसरात वाघाचा धुमाकूळ; नागरिक भयभीत!... सोशल मीडियावर व्हिडिओ #Viral
भंडारा तालुक्यातील कोका वन्यजीव अभयारण्य लगतच्या मंडणगाव ते खमारी मार्गावर वाघाचे सातत्याने दर्शन होत असल्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. सध्या खरीप हंगाम अंतिम टप्प्यात असल्याने शेतशिवारात नागरिकांची वर्दळ आहे, मात्र वाघाच्या दर्शनामुळे शेतकरी आणि मजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. एका पशुपालकाच्या शेळ्यांवर वाघाने हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटनाही घडली आहे. यामुळे परिसरात वाघाची भीती अधिकच वाढली आहे. याच दरम्यान, मंडणगावजवळ वाघाचे रात्रीच्या वेळी दर्शन झाल्याचा एक.