वाशी: तेरखेडा परिसरात चालत्या वाहनातून साहित्याची चोरी , येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.
येरमाळा पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर रोड (एनएच-52) वरील तेरखेडा पुलाजवळ ट्रकमधून अज्ञात व्यक्तीने तब्बल 20 हजारांचा माल चोरल्याची घटना घडली आहे. फिर्यादी राजेश हसराजभाई काजिरिया (वय 32, रा. विवेकानंद सोसायटी, नंदना, ता. कल्याणपुर, जि. देवभूमी द्वारका, गुजरात) हे दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 8 वाजता ट्रक (क्र. जी.जे. 37 टी 8548) घेऊन सोलापूर रोडने जात असताना, अज्ञात चोरट्याने ट्रकवर चढून दोन रिन वॉशिंग बॅग, गॅस शेगडीचा बॉक्स, तसेच लहान मुलांचे 12 नग बुलबुले (कार्टूनमध्ये) अस