हिंगणघाट उद्योगपती रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मुंबई यांच्या अध्ययन सदस्यपदी जाम येथील पिव्ही टेक्सटाईल्सचे महाप्रबंधक भूपेंद्र शहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती विद्यापीठाचे कुलगुरू मा. राज्यपाल यांच्या मान्यतेने करण्यात आली असून ही नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. भूपेंद्र शहाणे हे विद्यार्थी काळा पासून अभाविपचे कार्यकर्ते असून अभाविपच्या विविध जबाबदाऱ्या त्यांनी कुशलतेने सांभाळल्या आहेत.