पो. स्टे.देवलापार अंतर्गत येणाऱ्या बेलदा येथे राहणारे येनीराम धोंडुजी कुमरे वय अंदाजे 52 वर्ष यांचा मृतदेह रविवार दिनांक 28 डिसेंबरला सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान बेलदा जवळील एका नाल्यात तरंगताना दिसल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांचा मृत्यू कसा झाला असावा याबाबत परिसरात उलट सुलट चर्चा होती. माहितीप्रमाणे येनीराम हे शुक्रवार दिनांक 19 डिसेंबरला रात्री अकरा वाजता पासून घरी कुणालाही न सांगता जंगलाच्या दिशेने निघून गेले होते. तेव्हापासून त्यांचे कुटुंबीय चिंतेत होते.