भंडारा: परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ.... मित्र पक्षावर परिणय फुके करतात आरोप.....नरेंद्र भोंडेकर यांची टीका.....
भंडारा जिल्ह्यात चार नगर परिषद निवडणुका लागल्या असून प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक सभेत परिणय फुके हे मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेवर टीका करतात. पण विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवर टीका करत नाही. आमदार फुकें हे भंडाऱ्याच्या जलपर्यटनाच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत. पण कामे करत असताना टप्प्याटप्प्यांचे पैसे येतात मग भ्रष्टाचार कसा झाला.? हा देखील सवाल आहे. तर दुसरीकडे परिणय फुके व नाना पटोले यांची साठगाठ झाली असल्याची शंका आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे.