शाहूवाडी: शाहुवाडी तालुक्यातील वन्यप्राण्यांमुळे झालेल्या हानीसाठी वन विभागाकडून 21.44 लाखांची मदत
शाहुवाडी तालुक्यातील मलकापूर वनपरिक्षेत्र कार्यालयाने आज गुरुवार दिनांक 10 जुलैला वन्यप्राण्यांकडून झालेल्या पीकहानी आणि मनुष्यहानी ग्रस्त 25 शेतकऱ्यांना एकूण 21 लाख 44 हजार 357 रुपयांचे धनादेश वाटप केले.अशी माहिती सायंकाळी चार वाजता वनपरिक्षेत्र अधिकारी उज्वला मगदूम यांनी दिली.