शॉर्टसर्किटमुळे तिपराळ येथे ऊस जळून खाक तालुक्यातील तिपराळ येथे शॉर्टसर्कीटमुळे बस्वराज माधव बिरादार यांच्या शेतातील हाताला आलेले १ हेक्टर ५० आर ऊस व शेती उपयोगी जळून खाक झाला असून या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, यासाठीचे निवेदन तहसीलदार व महावितरण यांना देण्यात आले आहे.