गोरेगाव: माॅ दुर्गा शंकरपट समिती तीमेझरी द्वारे तीन दिवशीय भव्य इनामी शंकर पटाचे उद्घाटन
माॅ दुर्गा शंकरपट समिती तिमेझरी द्वारा आयोजित तीन दिवशी भव्य इनामी बैलांचे जंगी शंकर पटाचे आयोजन अत्यंत भव्यता आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले. या शंकर पटाचे विधिवत उद्घाटन दि.23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास बँक संचालक दुर्गाप्रसाद ठाकरे, माजी उपसभापती सुरेंद्र बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. शंकर पट पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि शंकर पट प्रेमींनी यावेळी मोठी गर्दी केली होती. शंभरहून अधिक जोड्यानी या शंकर पटात सहभाग नोंदविल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.