सध्याचे युग हे वाढते स्पर्धेचे युग असून शासकीय नोकरी मिळवण्याची स्पर्धा ही अतिशय महत्वाची असून यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा नेमके कशी असते? याचे ज्ञान मिळावे ह्या हेतूने धर्माबाद पोनि भडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसाच्या वतीने आता दर रविवारी पोलीस स्टेशन धर्माबाद येथे स्पर्धा परीक्षा घेण्यात येणार असून आजरोजी देखील ही परीक्षा सकाळी 11 ते 2 पर्यंत घेण्यात आली असून प्रथम द्वितीय तृतीय गुण घेणाऱ्याला पारितोषिक देखील देण्यात आले आहे.