नगरपंचायत निवडणूकीत नगरसेवक पदासाठी आम आदमी पार्टीच्या उमेदवार शालिनीताई संजय सुखधान यांनी सर्वाधिक मताधिक्याने नेत्रदिपक विजय मिळवला आहे. सुखधान यांच्या रुपाने महाराष्ट्राच्या राजकारणात आम आदमी पार्टीने खाते उघडले आहे. या निवडणूकीत प्रत्यक्षात झालेल्या ९९५ पैकी तब्बल ७१९ मते सौ. सुखधान यांना मिळाली.