मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी बेकायदेशीर मागणी करून आमच्या जमिनीच्या व्यवहारावर बंदी आणली असल्याचा आरोप करत भाजपचे नेते चंद्रशेखर अत्तरदे आणि माधुरी अत्तरदे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. दरम्यान आमदार राजूमामा भोळे यांनी मध्यस्थी करत मुख्यमंत्र्यामार्फत हा प्रश्न सोडविला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर सरबत देवून उपोषण मागे घेण्यात आले.