सेलू येथील दीपचंद चौधरी विद्यालयाने पुन्हा एकदा आपली दमदार कामगिरी सादर करत राज्यस्तरीय शालेय लंगडी स्पर्धेत अव्वल स्थान पटकावले आहे. ३ जानेवारी रोजी संपन्न झालेल्या या स्पर्धेत सेलूच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संघभावना आणि कौशल्याच्या बळावर ट्रॉफीवर आपले नाव कोरले. विजेत्या संघाला रात्री १०.३० वाजता पार पडलेल्या समारंभात ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.