कोपरगाव: शहरातील बेट परिसरात निवडणूकीच्या कारणातून तरुणास मारहाण
कोपरगाव शहरात निवडणूक काळात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे (वय ३१, रा. वारी) यांच्यावर आज दिनांक१५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता हल्ला करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, बाबासाहेब ठोंबरे हे आज सकाळी वारी येथून कोपरगावच्या दिशेने समता पतसंस्था येथे कामावर जात असताना बेट परिसरात काही अज्ञात दुचाकी वाहन चालकांनी त्यांना थांबवले. यावेळी “तूच सोशल मीडिया बघतोस का?” असे म्हणत त्यांना मारहाण करण्यात आली आहे.