नेवासा तालुक्यातील कारवाडी येथील मुनसी समसुदद्दीन शेख यांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली. कारवाडी पाचेगाव येथील मुनसी शेख यांच्या शेळ्यांवर काल रात्री बिबट्याने हल्ला केला.या हल्ल्यात एक शेळी ठार झाली.त्यामुळे सदर शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे.बिबट्याला पकडण्यासाठी त्वरीत पिंजरा लावण्यात यावा,अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.