साकोली: साकोलीतील संत लहरी बाबांची पुण्यतिथी महोत्सव उद्यापासून,लहरीबाबा मठात सभेचे आयोजन, सुमारे एक लाख भाविक होणार सामील
साकोली येथील परिसराचे श्रद्धास्थान असलेले संत लहरीबाबा यांच्या 109व्या पुण्यतिथीचा तीन दिवसीय कार्यक्रमाचे शनिवार दि.10 जानेवारीपासून आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवशी धार्मिक कार्यक्रमात एक लाखपेक्षा अधिक भाविक सहभागी होणार आहेत.या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शुक्रवार दि.9 जानेवारीला रात्री सात वाजता साकोली येथील लहरी बाबा मठामध्ये सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे