छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. त्यावेळी राणे यांचे समर्थक ठाकरेचे समर्थक यांच्यात वाद निर्माण झाला होता. मात्र राणे यांनी ठोकून काढू अशी भाषा वापरली असल्याचा विरोधकांचं म्हणणं आहे. यावर आज दुपारी ४ वाजता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे. नारायण राणे यांनी अशी भाषा वापरणे फार स्वभाविक असल्याच अंधारे म्हणाले आहेत. हे सरकार ठोकशाहीचं सरकार आहे असं त्या म्हणाल्या.