हिंगणघाट येथील टिळक चौक परिसरात राहणारे आनंद गिरी यांचा मुलगा दक्षगिरी काल सायंकाळी टिळक चौकात दर गुरुवारी होणारा महाप्रसाद घेण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. मात्र सायंकाळ उलटूनही तो घरी न परतल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री उशिरापर्यंत तो न सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.कालपासूनच बेपत्ता मुलाचा शोध कुटुंबीय व नातेवाईकांकडून युद्धपातळीवर सुरू होता. आज शोधमोहीम सुरू असतानाच पुरातन डागामील गिरणीच्या पाण्याच्या टाकीत दक्षगिरीचा मृतदेह आढळला.