नगर दारूच्या नशेत असलेल्या कारचालकाने कार भरधाव वेगात चालवत एका मोपेडला जोराची धडक दिली. या अपघातात मोपेडवरील ठकाजी रखमाजी तरटे (वय ८०, रा. पळवे खुर्द, ता. पारनेर) यांचा जागीच मृत्यू झाला तर मोपेड चालक गंभीर जखमी झाला आहे. पारनेर तालुक्यातील पळवे गावच्या शिवारात रविवारी (ता. २१) सायंकाळी हा भीषण अपघात झाला