औसा: शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी व्ही.एस. पँथरचे हाश्मी चौकात रस्ता रोको आंदोलन
Ausa, Latur | Mar 7, 2024 व्ही.एस.पँथर्स औसा तालुका शाखेच्या वतीने गुरुवारी दुपारी हाश्मी चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. औसा शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, याकतपूर रोडवरील मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोरील बार तत्काळ बंद करण्यात यावे, शासकीय नोकरभरती कंपन्यांमार्फत न करता महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत करण्यात यावी इ. मागण्यांसाठी हा रस्ता रोको करण्यात आला होता. दरम्यान आंदोलनानंतर तहसीलदारांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.