खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह चार नगरसेवक निवडून आणल्याच्या पार्श्वभूमीवर आज दि २३ डिसेंबर रोजी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरात भव्य विजय रॅली काढण्यात आलीय या रॅलीत पक्षाचे कार्यकर्ते व समर्थकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत शहरातील प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढली. ढोल-ताशे, फटाके आणि जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. विजय रॅलीदरम्यान नवनिर्वाचित नगराध्यक्ष सय्यद आमेर पटेल यांनी मतदारांचे आभार मानले.