नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान प्रशासनाचा मोठा हलगर्जीपणा समोर आल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदारांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील पक्षाच्या उमेदवार करुणा राऊत यांचे नाव आणि चिन्ह मतदानाच्या वेळी मशिनवर असूनही, मतमोजणीच्या वेळी ते मशिनवर का नव्हते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. इतकेच नव्हे तर, मशिनवर 'नोटा'चा (None of the Above) पर्यायही उपलब्ध नसल्याचा दावा करत त्यांनी केला.