येत्या २ डिसेंबरला होणाऱ्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरातील बस स्थानक परिसरात आज दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने दंगल काबु प्रात्यक्षिक करण्यात आले. पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दंगल काबू प्रात्यक्षिक केले. यावेळी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.