हंगाम २०२५-२६ अंतर्गत केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून मुग, उडिद आणि सोयाबीन या पिकांची खरेदी नाफेडमार्फत करण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया ३० ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाली असून, खरेदी प्रक्रिया १५ नोव्हेंबर पासून सुरु होईल