भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
सुप्रिया सुळे, तुमच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी शरद पवार गटाने महिलांच्या सुरक्षेसाठी मोठमोठ्या बाता मारल्या पण आज राज्यातील महिलांसमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा ठाकला आहे. तुमचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका बलात्कार प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आहे. या संदर्भात एक आडिओ क्लिप देखील समोर आली आहे, ज्यात हे स्पष्टपणे ऐकायला येतंय की जितेंद्र आव्हाड आरोपीला मदत करत होते. अशी टीका आज सकाळी ११.३५ वाजता भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली.