आज दिनांक 11 डिसेंबर रोजी सकाळी 11च्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दाखल झाले आहेत. ठाण्यातील शासकीय विश्रामगृह येथे राज ठाकरे यांचं आगमन झालं आहे. राज ठाकरे आज एका प्रकरणात ठाणे कोर्टात हजर राहणार आहेत. 2022 मध्ये एका सभेत राज ठाकरेंनी तलवार उचवली होती. त्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणी आज सुनवाई होणार आहे. तसेच मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेचे इतर नेते देखील कोर्टात हजर राहणार आहेत.