हिंगणघाट नगरपरिषदेच्या २ डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी आज २१ डिसेंबरला उपविभागीय अधिकारी कार्यालयात पार पडली असून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या डॉ नयनाताई तुळसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शहर पवार पक्षाच्या शुभांगीताई डोंगरे यांचा १८ हजार ७५ इतक्या मताधिक्याने पराभव करून दणदणीत विजयी संपादन केला आहे.आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढविण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपने ४० पैकी ३० नगरसेवक पदावर विजय संपादन केला आहे.