भुदरगड: भटवाडी येथील कलापूर नावाच्या शेतात महिलेवर गव्याचा हल्ला महिला ठार
भुदरगड तालुक्यात जनावरे चालण्यासाठी गेलेल्या राजश्री मधुकर लाड या महिलेवर गाव्याने हल्ला केल्याची घटना घडली त्यांचे वय 73 वर्षे होते या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना कलापूर या शेतात घडली आहे. राजश्री लाड व त्यांचा मुलगा जनावरे चालण्यास गेले होते. गवा आल्याचे मुलाने आईला सांगण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत गव्याने हल्ला केला. या हल्ल्यात राजश्री ठार झाल्या. गव्याने हल्ला केल्याचे समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती.