पोलीस स्टेशन वेलतुर अंतर्गत येत असलेल्या राजोला शिवारातील कन्हान नदीच्या पाण्यात मासेमारी साठी गेलेल्या 45 वर्षीय तरुणाचा डोंगा पलटी झाल्याने कन्हान नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना 20 जानेवारी मंगळवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली.संतोष हरी उके वय 45 राहणार राजोला असे मृतकाचे नावं आहे .घटनेची माहिती वेलतुर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करण्यात येऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून शवविच्छेदन साठी पाठविण्यात आला.