पोलादपूर तालुका, उमरठ येथे विठ्ठल मंदिरासमोरील सभागृहाच्या कामाचा शुभारंभ कीर्तनकार, वारकरी सांप्रदायिक मंडळी, उमरठ येथील ग्रामस्थ तसेच तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. या सभागृहामुळे धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांना योग्य व्यासपीठ मिळणार असून गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.