आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज गुरुवार दिनांक ११ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १.५७ च्या सुमारास राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी कुष्ठरोगातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांना सन्मानाने जगता यावे यासाठी, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार कायद्यातील कलम ९ आणि २६ मधून ‘कुष्ठरोग’ व ‘महारोग’ हे शब्द वगळले जाणार असल्याचे विधानसभेच्या सभागृहात स्पष्ट केले.